अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक जाहीर, शिवसेनेचं धनुष्यबाण गोठवणार?

मुंबईमधील अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर ती जागा रिक्त झालेली होती. 3 नोव्हेंबरला मतदान तर 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर जाहीर झालेली ही पहिलीच निवडणूक आहे. पण या पोटनिवडणुकीत एक मोठा पेच दोन्ही गटासमोर आहे तो म्हणजे चिन्हाचा ! ठाकरे विरुद्ध शिंदे यांच्यात लढाई सुरु असताना शिवसेनेच्या चिन्हाचे काय होणार हा मोठा प्रश्न कायम आहे.
By-elections to 7 Assembly seats across 6 States to be held on 3rd November, results on 6th November pic.twitter.com/6ezM1WHDqV
— ANI (@ANI) October 3, 2022
दरम्यान, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ही पहिली निवडणूक आहे. त्यात आता अंधेरी मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागलेले आहे. या रिक्त जागेसाठी शिवसैनिकांकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. पण ठाकरे गट आणि शिंदे गटासमोर पक्षचिन्हावरून पेच निर्माण झालेला आहे.
नुकत्याच सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानुसार शिवसेना कुणाची आणि पक्षचिन्ह कुणाचे हा वाद निवडणूक आयोगाकडून सोडविण्यात येणार आहे. आता असे असताना दोन्ही गट उमेदवार देवू शकतात का समजा दिले तर पक्ष आणि चिन्हाचे काय असे अनेक प्रश्न उभे राहीले आहेत शिवाय दोन्ही गटात संभ्रम आहेच.