अंधेरी पूर्व पोटनिवडणूक : 3 फॅक्टर उद्धव ठाकरेंचं भविष्य ठरवणार !

दसरा मेळाव्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटात चढाओढ लागलेली आहे. पण उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा खरा कस किंवा टेस्ट होणार आहे ती अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये! एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होणार असून दोन्ही गटासाठी आरपारची लढाई असेल यात शंकाच नाही. आपल्या पक्षातील ४० आमदार, १२ खासदार सोडून गेल्यावर ठाकरेंसाठी ही निवडणूक जिंकणं प्रतिष्ठेचं बनलेल आहे. या निवडणुकीत ठाकरेंचं भवितव्य ठरवणारे तीन महत्त्वाचे फॅक्टर आहेत.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचे मतदान ३ नोव्हेंबरला तर ७ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटकेंच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणूक होतेय. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी ऋतुजा लटकेंना उमेदवारी जाहीर केली आहे.तर भाजपकडून मुरजी पटेल यांचे नाव आघाडीवर आहे. आता या निवडणुकितून शिंदे गटाने माघार घेतली असून ती जागा भाजपला दिली आहे असे म्हटले जातेय. याच पार्श्वभूमीवर तीन फॅक्टर महत्वाचे आहेत.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीमध्ये पहिला आणि महत्त्वाचा फॅक्टर आहे सहानुभुतीचा. दीवगंत आमदार रमेश लटके हे धडाडीचे शिवसैनिक म्हणून ओळखले जात, त्यांच्या अकाली निधनामुळे सगळ्यांनाच जोरदार धक्का बसला. आता ठाकरेंनी त्यांच्या पत्नीला ऋतुजा लटकेंना उमेदवारी दिलेली आहे. लटकेंच्या कुटुंबातील सदस्य रिंगणात असेल, तर त्याच्यासाठी सहानुभुतीचा फॅक्टर काम करतो.

अंधेरी पूर्व मतदारसंघ मुंबईच्या उपनगरामध्ये येतो.तिथे मराठी मतांसह अमराठी टक्कासु्द्धा तेव्हढाच निर्णयाक आहे. अंधेरीत सुमारे पावणे तीन लाख मतदार आहेत. यामध्ये सर्वाधिक १ लाख मतदार मराठी आहेत. त्यानंतर इतर भाषीक बांधवांचा दबदबा तिथे आहे. याटा अर्थ काय तर लाखभर मराठी, लाखभर अमराठी मतं आहेत. पण जर मराठी मतांमध्ये फाटाफूट झाली, तर त्याचा मोठा फटका उद्धव ठाकरेंना बसू शकतो. त्यामुळे ठाकरेंसाठी सगळं काही मराठी मतांच्या एकजुटीवरच अवलंबून आहे म्हणून दुसरा फॅक्टर मराठी मतांचा आहे.

अंधेरीत दोन निवडणुका शिवसेनेने जिंकलेल्या आहेत. पण हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे हे ठाकरेंना विसरून चालणार नाही. सलग तीनवेळा येथूनच काँग्रेस उमेदवार सुरेश शेट्टी विजयी झाले होत. २०१९ मधे रमेश लटके अवघ्या १७ हजार मतांनी जिंकले होते हे ठाकरे गटाला विसरुन चालणार नाही. मराठी मतं लाखभर असूनही पटेलांनी टफ फाईट दिली आणि आता हेच पटेल भाजपचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. या निवडणुकित भाजप आणि ठाकरेंमध्ये सरळ लढत आहे. पण काँग्रेसची पारंपरिक मतं निर्णायक ठरणार आहेत. मराठी आणि अमराठी दोन लाख मतं वगळल्यास जवळपास ५३ हजार मतं मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाची मते आहेत. त्यामुळे ठाकरेंचा उमेदवार मविआचा म्हणून रिंगणात उतरतो की शिवसेना यावरसुद्धा विजयाचे सारे गणित अवलंबून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.