सिंह समोर असताना मुलीने काय केले पाहा?

एखाद्या प्राण्याला चिडवू नये असे सांगतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय त्यात एक मुलगी चक्क सिंहाला चिडवताना दिसतेय. आता एका मुलीने चिडवल्यावर जंगलचा राजा गप्प राहणार असं वाटतं का तुम्हाला? इन्स्टाग्रामवर ambafacts या अकाऊंटवरुन एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. त्यात एक मुलगी काचेच्या बॉक्समधून सिंहाला पाहण्यासाठी येते. तिला पाहिल्यावर सिंह पुढच्या पायांचे पंजे काचेवर घासायला लागतो. ते पाहून ही मुलगीही आपल्या हाताने सिंहासारखेच करते. 

आपण एखाद्या लहान मुलाला किंवा आपल्या पाळीव प्राण्याला ज्याप्रमाणे चिडवतो त्याचप्रमाणे ही मुलगी सिंहाला चिडवत असल्याचे पहायला मिळतेय. सिंह चिडल्यानंतर त्याच्यासोबत त्या मुलीने फोटोही काढलेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये तरुणी सिंहाला त्रास देताना दिसतेय.त्यामुळे वैतागलेला आणि काहीसा त्रासलेला सिंह आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसतोय.

सिंहाला इतक्या जवळून पाहिल्यावर आपल्याला काहीशी भिती वाटू शकते. पण ही मुलगी मात्र अतिशय बिनधास्तपणे या सिंहाशी हातवारे करत खेळत असल्याचे दिसते. इतकेच नाही तर त्याच्याशी असा खेळ केल्यानंतर ती अतिशय मनसोक्तपणे हसताना दिसते. तर २ मिनीटांनी तिची एक मैत्रीण मागून आतमध्ये येते आणि त्या दोघी सिंहाच्या बाजूला फोटोसाठी पोज देतात. तर त्यांच्यासोबत असलेली आणखी एक व्यक्ती या गुहेसारख्या ठिकाणातून त्यांचा फोटो काढत असल्याचे दिसते. २६ लाखांहून अधिक जणांनी हा व्हिडिओ लाईक आणि शेअर केलाय.अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या असून काहींनी राग तर काहींनी आनंद व्यक्त केलाय.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.