आमदारांवर कोट्यवधी रुपये कोण उधळतंय? काय म्हणाले अनिल गोटे?

एकनाथ शिंदे आणि इतर पळून गेलेल्या बंडखोर आमदारांवर कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. या आमदारांचा गुवाहाटीतील खर्च कोण करत आहे, असा सवाल माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. ते मुंबईत बोलत होते. या विषयी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहिले आहे.

एक खाणारे जाऊन दुसरे येणार’

हे सरकार गेले आणि ते सरकार आले तर सर्वसामान्य नागरिकांवर काहीही फरक पडणार नाही. उलट एक खाणारे जाऊन दुसरे खाणारे आले, एवढाच काय तो फरक असेल, असे ते म्हणाले. या माणसांवर एवढा खर्च कसा? सहा फ्लाइट. दोन माणसांसाठी विशेष विमान. हा सर्व खर्च करत आहे कोण, असा सवाल त्यांनी केला. भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस अत्यंत कपटी, लबाड आणि कारस्थानी आहेत. त्यांचेच हे कारस्थान आहे. हा लोकशाहीचा खेळ देशाला घातक आहे.

‘खुलेआम नंगानाच सुरू’

राज्याच्या अनेक भागांत पेरण्या झालेल्या नाहीत. काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आले आहे. खत उपलब्ध नाही. याकडे कोणाचेही लक्ष नाही. दुसरीकडे अशाप्रकारची पैशांची उधळपट्टी होत आहे. हा पैसा नेमका कुठून आला, याचा तर हिशोब लावायचा आहे, असे अनिल गोटे म्हणाले. महाराष्ट्रात जो काही राजकीय तमाशा सुरू आहे, खुलेआम नंगानाच सुरू आहे. त्याला न्यायालयाने रोख, लगाम लावायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.