मला मातृभूमीची कीव येते- अन्नू कपूर

अभिनेता अन्नू कपूर चार दशकापासून अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. क्रॅश कोर्स या वेबसिरीजमधून ते सगळ्यांच्या भेटीला येत आहेत. यानिमित्ताने त्यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला मुलाखत दिली त्यावेळी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं. खरंतर त्यांना देशाची सेवा करायची होती पण घरच्या बिकट परिस्थितीमुळे त्यांना वडिलांच्या थिएटर कंपनीत काम करावं लागलं. आपण जरी आयएएस अधिकारी झालो नाही तरी एक अभिनेता म्हणून देशाची खूप गांर्भियाने सेवा केलेली आहे असेही अन्नू कपूर यांनी सांगितले. 

दरम्यान राजकारणसंदर्भात त्यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या चर्चा होते आहे. ‘तुम्ही राजकारणात प्रवेश करणार का?’ असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना अन्नू कपूर म्हणाले, ‘मी राजकारणासाठी योग्य नाही. मी एका कार्यक्रमात पॉलिटीशियन या शब्दाचा अर्थ सांगितला होता.पॉली म्हणजे खूप किंवा असभ्य भाषा आणि टिशियन म्हणजे रांगणारे किडे. राजकारणी असोत की न्यायव्यवस्थेतले किंवा नोकरशाहीतले सगळेच या व्यवस्थेचा भाग आहेत आणि दुर्दैवाने आपली व्यवस्था ही जगातील सर्वात भ्रष्ट, खोटी आणि दिखाऊ व्यवस्था आहे. मला स्वित्झर्लंड, अमेरिका किंवा ग्वाटेमाला या देशांची चिंता नाही मला भारताची चिंता आहे. मला माझ्या मातृभूमिबद्दल गांभिर्य आहे आणि मला भारताबद्दल दया येते.’  

या मुलाखतीत अन्नू कपूर यांनी  बुकर पारितोषिक विजेत्या लेखिका अरुंधती रॉय यांच्यावर आरोप केलेत.अरुंधती रॉय यांनी भारताचा विश्वासघात केल्याचा आरोपही केला आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.