‘या’ ठिकाणी सुरु होणार Apple चे भारतातील पहिले फ्लॅगशिप रिटेल स्टोअर

Apple ही एक लोकप्रिय टेक कंपनी असून आयफोन आणि अन्य उपकरणासाठी प्रसिद्ध आहे. Apple भारतीय बाजारपेठमध्ये गुंतवणूक करण्याबाबत अतिशय गंभीरपणे विचार करत आहे. Apple उत्पादनांच्या उत्पादक कंपन्या भारतात सातत्याने आपले प्लांट उभे करत आहेत. फॉक्सकॉन कंपनीने तर तेलंगणा राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. आता Apple भारतातील आपले पहिले फ्लॅगशिप रिटेल स्टोअर उघडणार आहे.

भारतीय बाजारपेठेमध्ये Apple कंपनी आपले पहिले फ्लॅगशिप रिटेल स्टोअर उघडणार आहे. पुढील माहिन्यात हे पहिले फ्लॅगशिप स्टोअर मुंबईमध्ये उघडण्यात येणार आहे. त्यानंतर दुसरे फ्लॅगशिप रिटेल स्टोअर हे राजधानी दिल्ली मध्ये उभारले जाणार आहे. भारतामध्ये सध्या Apple चे फक्त ऑनलाईन स्टोअर उपलब्ध आहे. इतर स्टोअर्स हे कंपनीचे अधिकृत स्टोअर्स आहेत. Apple चे मुंबईतील स्टोअर रिलायन्स इंडस्ट्रीच्या जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये उभारण्यात येणार आहे. हे स्टोअर या मॉलमध्ये २२ हजार स्केअरफूटमध्ये उभे राहणार आहे. मुंबईचे स्टोअरही न्यूयॉर्क, बीजिंग आणि सिंगापूरसारख्या अ‍ॅपलच्या स्टोअरसारखेच असणार आहे इंग्रजी वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.

Apple चे भारतातील दुसरे फ्लॅगशिप स्टोअर राजधानी दिल्ली येथे उभारण्यात येणार आहे हे स्टोअर सिटीवॉक मॉल इथे उभरले जणार आहे. ही स्टोअर १०,००० ते १२,००० स्क्वेअरफूटमध्ये उभारले जाणार आहे. या स्टोअरचे लॉन्चिंग एप्रिल ते जून या महिन्यामध्ये दरम्यान होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.