मुख्यमंत्री शिंदेंनी उदय सामंतांना काय दिले गिफ्ट?

एकनाथ शिंदेंनी त्यांच्यासमवेत असलेल्या 50 बंडखोर आमदारांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नसल्याचे म्हटले होते.एकनाथ शिंदे गटात केवळ आमदारच नाही, तर मंत्रीही सहभागी झाले होते. शेवटच्या क्षणाला मंत्री उदय सामंत यांनी शिंदेगटात सहभागी होत शिवसेनेला मोठा धक्का दिला होता. आता, मुख्यमंत्री होताच एकनाथ शिंदेंनी उदय सामंताना आनंददायी भेट दिली आहे.
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय प्रस्तावित होता. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाला देण्यात आले आहेत. हे महाविद्यालय सुरू करण्याची आग्रही मागणी शिवसेना आमदार उदय सामंत यांनी केली होती. पुढच्या वर्षी नव्या शासकीय महाविद्यालयात प्रवेश घेता येऊ शकतील. एकनाथ शिंदे यांनी स्वतः सोशल मीडिया अकाऊंटवरुन याविषयीची माहिती दिली.
तर, उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानले व ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती शेअर केले.