आषाढी एकादशीचा उपवास करताना लक्षात ठेवा १३ गोष्टी

आषाढी एकादशीचा उपवास घराघरात केला जातो.उपवास करणे म्हणजे पोटाला आराम देणे असल्याने या दिवशी आहारात हलक्या पदार्थांना समावेश करायला हवा.तुम्ही आषाढी एकादशीचा उपवास करत असाल तर खालील गोष्टी लक्षात ठेवा.

१. १० जून (रविवारी) रोजी आषाढी एकादशी आहे. उपास म्हणजे आत्मशुद्धी असे शास्त्र सांगते. उपासाच्या दिवशी खाण्यापिण्याची बंधने पाळणे, एक दिवस पोटाला विश्रांती असा त्यामागचा उद्देश.

२. उपवासाच्या पदार्थांमध्येही कॅलरी वाढविणारे घटक असल्याने आरोग्याच्या दृष्टीने उपवास काहीवेळा अनारोग्यदायी ठरु शकतो.

३. उपवास करणे म्हणजे पोटाला आराम देणे असल्याने या दिवशी आहारात हलक्या पदार्थांना समावेश करायला हवा.

४. ताक, दूध, शहाळे पाणी, लिंबू सरबत यांसारख्या पेयांचा वापर केल्यास उपवासामुळे कमी होणारी ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते.

५. फक्त बटाटा खाण्यापेक्षा खजूर, राजगिरा, रताळे, सुकामेवा पदार्थ उपवासाला आवर्जून खा.यामुळे जास्त उर्जा मिळते. त्रास होण्याची शक्यताही कमी असते.

६. साबुदाणा मर्यादेत खाल्ल्यास त्रास होत नाही. जास्त प्रमाणात खाल्ल्यास आरोग्याला त्रास होण्याची शक्यता असते.

७. साबुदाणा खिचडी मर्यादेत खालली तर त्रास होत नाही.

८. शेंगदाण्यामुळे पित्ताचा त्रास होऊ शकतो.

९. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती उपवास करत असेल तर त्याने आवर्जून फळ खायला हवी.

१० फळातील साखरेमुळे शरीराला उर्जा मिळते. फळं पचायलाही सोप्पी असतात.

११ उपवासाच्या दिवशी जास्तीत जास्त फळांचा आहारात समावेश ठेवल्यास भूक भागते.

१२ मधुमेही लोकांनी देखील उपाशी राहणे टाळावे. साबुदाणा, वरई हे पदार्थ खाणे टाळावे.

१३ उपवासाचे पदार्थ कधीतरी खायला मिळतात म्हणून जर जास्तच खाणे झाले तर पित्त, वजन वाढ होते. त्यामुळे ते टाळणे आवश्यक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.