मुख्यमंत्री शिंदेंच्या सभेला भाडोत्री गर्दी? ऑडिओ क्लिप व्हायरल !

औरंगबादमधील पैठण येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा आहे. कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांचा हा मतदारसंघ असून त्यांनी या सभेचं आयोजन केलंय. राज्यात ठाकरे विरुद्ध शिंदे गट हा संघर्ष सुरु असताना तसेच औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे या सभेकडे सगळ्यांच लक्ष लागलंय. ही सभा सुरु होण्याआधीच त्याची चर्चा सुरु झालीय कारण सभेला गर्दी जमविण्यासंदर्भात एक ऑडिओ क्लिप व्हायपल झालीय. आम्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही पण ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याची जोरदार चर्चा सुरु झालीय.

सभेसाठी अडिचशे नाही तर तीनशे रुपये द्या असा संवाद या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला येतोय. महिला सभेला येण्यासाठी तीनशे रुपये मागतात असा आशय यात आहे. आपल्याला जेव्हढया महिला येतील तेवढ्या कमीच आहेत. भुमरे साहेब मंत्रिमंडळाता बसलेत असा संवाद कार्यकर्त्ये एकमेकांशी करत आहेत.ही ऑडिओ क्लिप कोणाची आहे ती कोणी व्हायरल केली ते कार्यकर्ते कोण आहेत याची अद्याप पुष्टी झालेली नाही. दरम्यान शिवसेना नेते  चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटावर आरोप केलाय सभेसाठी शिंदे गट पैसे घेवून लोकं जमा करतात. आजच्या पैठणच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जाहीर सत्कार होणार आहे त्यामुळे मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. आता या ऑडिओ क्लीपबद्दल काय होतं ते लवकरच कळेल. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.