अवतार-२ मधील ‘केट’चा लूक पाहिला का?

हॉलिवूडचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ मधील अभिनेत्री केट विन्स्लेटचा फर्स्ट लूक रिलीज झालाय. तिच्या व्यक्तिरेखेचं नाव रोनल असणार आहे. ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’चा टीझर आधीच रिलीज झाला असून केटचा लूक सगळ्यांना आवडला आहे.
केट विन्स्लेट एका योद्ध्याच्या भूमिकेत दिसणार आहे. एम्पायर मॅगझीनशी बोलताना ऑस्कर विजेती अभिनेत्री केट विन्स्लेट म्हणाली की, ‘रोनल पँडोराच्या अथांग समुद्रात राहणाऱ्या मटकैना जमातीचे नेतृत्व करते आहे. आगामी चित्रपटात माझी महत्त्वाची भूमिका असून रोनाल एक अतिशय निष्ठावान आणि निर्भीड नेता आणि योद्ध्याच्या रुपात दाखवली आहे’
हा चित्रपट 16 डिसेंबर 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. भारतात हा चित्रपट तामिळ, तेलगू, हिंदी, इंग्रजी, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’चे दिग्दर्शन जेम्स कॅमेरॉन यांनी केले आहे. याचा पहिला भाग 2009 मध्ये रिलीज झाला होता. अवतारने जगभरात सुमारे 20 हजार कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले होते.