फ्रिजमध्ये ‘या’ गोष्टी ठेवू नका

आपण अनेक गोष्टी खराब होऊ नये म्हणून फ्रिजमध्ये ठेवतो. आज खूप कमी लोकं असे सापडतील ज्यांच्या घरात फ्रिज नाही. त्यामुळे सगळेच जण फ्रिजचा वापर करतात. ज्या लोकांना रोज भाजीपाला आणि फळे आणायला वेळ मिळत नाही, ते फ्रीजमध्ये आणून ठेवतात. फ्रीजमध्ये या गोष्टी जास्त काळ ताज्या राहू शकतात. पण काही फळे आणि भाजी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे टाळावं.  फ्रीजमध्ये(Fridge food) ठेवल्यास त्यांच्यामुळे अन्नातून विषबाधाही होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया त्या भाज्यांबद्दल, ज्या फ्रीजमध्ये ठेवू नयेत. नाहीतर आरोग्यावर (Helath) गंभीर परिणाम होईल.

लिंबू

लिंबू आणि संत्री हे फळही सिट्रीक अॅसिडमुळे जास्त काळ थंड्या ठिकाणी चांगलं राहू शकत नाही. फ्रिजमध्ये ठेवल्याने यांच्यातील रस निघून जातोय.

काकडी

तीन दिवसांपेक्षा जास्त काळ 10 अंश सेल्सिअसच्या खाली ठेवल्यास काकडी वेगाने कुजतात. त्यामुळे काकडी फ्रीजमध्ये ठेवणे टाळावे. काकडी फ्रीजमध्ये ठेवण्याऐवजी सूर्यप्रकाशापासून दूर असलेल्या सामान्य ठिकाणी ठेवा.

कांदा

कांदे थंड, कोरड्या, गडद आणि हवेशीर खोलीत साठवले पाहिजेत. कारण कांदे ओलावा सहज शोषून घेतात. तापमान किंवा आर्द्रता जास्त असल्यास कांदे फुटू शकतात किंवा सडू शकतात. जर कांदे थंड खोलीच्या तापमानात ठेवले तर कांदे दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकू शकतात.

लसूण

लसूणही फ्रीजमध्ये ठेवू नये. कारण ते देखील ओलावा फार लवकर शोषून घेतात. म्हणून, कांद्याप्रमाणे, त्यांना थंड, कोरड्या जागी ठेवा. त्याच वेळी, त्यांना हवेची आवश्यकता असते, म्हणून लसूण कधीही पिशवीत बंद ठेवू नका.

सफरचंद

हे फळ फ्रिजमध्ये ठेवायचे असल्यास कागदात गुंडाळून भाज्या ठेवण्यासाठी असलेल्या खालच्या भागातच ठेवावे. बिया असणारे फळही फ्रिजमध्ये ठेऊ नये. कमी तापमनामुळे हे फळ लवकर पिकतं आणि खराब होऊ शकतं.

बटाटा

कच्चे बटाटे टोपलीत उघड्यावर ठेवणे चांगले मानले जाते. फ्रीजमध्ये ठेवणे टाळा. थंड तापमान कच्च्या बटाट्यामध्ये आढळणाऱ्या स्टार्च कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सची जागा घेते आणि बटाट्याची चव शिजवल्यावर गोड होईल. त्यामुळे त्यांना फ्रीजमध्ये ठेवणे टाळा.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.