फडणवीस-राज ठाकरे भेट ! काय म्हणाले बाळा नांदगावकर?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवास्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, राजकीय चर्चांना मोठ्या प्रमाणात उधाण आले आहे. या सर्वामध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबद्दल सर्वांनाच उत्सुकता असून मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी माध्यमांसमोर येत या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली याबद्दल काहीच माहिती नसल्याचे सांगितले आहे. फडणवीस हे राज ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आले होते असे नांदगावकर यांनी स्पष्ट केले.

नांदगावकर म्हणाले की, ‘मी स्वतः, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई आणि राज ठाकरे यांनी साधारण 15 ते 20 मिनिटे फडणवीसांसोबत चर्चा केली. त्यानंत आम्ही बाहेर पडलो. मात्र, फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये साधारण एक ते सव्वा तास चर्चा झाली. मात्र, या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे कधीच कोणती गोष्ट लपवून ठेवत नाहीत.’ त्यामुळे जे काही असतं ते नंतर स्वतः बोलतात. त्यामुळे नेमकी दोघांमध्ये काय चर्चा झाली हे राज ठाकरेंच्या आधी फडणवीसांकडून कळू शकेल असे सूचक विधान नांदगावकारांनी केले आहे.

ही युतीची सुरुवात आहे का असे विचारले असता ते म्हणाले की, ‘फडणवीस आणि राज ठाकरेंची मैत्री पूर्वीपासूनची आहे. मध्यल्या काळात भाजपला सत्ता स्थापनेसाठी जी काही मदत लागली आहे ती मनसेकडून प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला आहे. असे कण्यामागे राज्यात जी काही अस्थिरता होती ती स्थीर व्हावी यासाठी ही मदत होती. मदत करण्यामागे मौत्री ही एकच भूमिका होती. याचा अर्थ आमचा सरकारमध्ये समावेश असलाच पाहिजे असे म्हणणे चुकीचे आहे. तसेच आम्ही तशा प्रकारे मागणीदेखील केलेली नाही.’

राज ठाकरे आणि फडणवीस यापैकी कोणत्या नेत्यावर तुमचा अधिक विश्वास आहे असे विचारले असता ते म्हणाले की, ‘राजकारणामध्ये सर्वांवर विश्वास ठेवणे गरजेचे असते. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भाजप मनसे युती होऊ शकते का यावर त्यांनी आता बोलणे उचित ठरणार नाही’ असे विधान केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.