२८ वर्षांपुर्वी जागावाटपावरुन बाळासाहेब ठाकरे भाजपला काय म्हणाले होते?

शिवसेना आणि भाजप यांची एकेकाळी युती होती. दोन्ही पक्षात मित्रता होती असे म्हटले तरी चालेल. पण सध्याच्या राजकारणात मात्र शिवसेना आणि भाजप एकमेकांचे कट्टर शत्रू झालेले आहेत. तसं पाहिलं तर या दोन्ही पक्षांमधील भांडणं आत्ताची नाहीत अगदी बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातसुद्धा युती तुटली तर काय असे वक्तव्य बाळासाहेबांनी केले होते.
दसरा मेळावा १९९४मधील बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण सध्या व्हायरल होते आहे. फक्त काँग्रेसला गाडणे हा उद्देश नाही तर लोकांसाठी चांगलं सरकार द्यायचं, लोकांच्या मनावर हिंदुत्वाचा ठसा उमटवायचा यासाठी आम्हाला सत्ता हवी असं बाळासाहेबांनी सांगितलं होतं. याचं भाषणात दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपसोबत युती तुटली तर काय करणार? असा सवाल विचारला होता. यावरुन लक्षात येतं भाजप-शिवसेनेते त्या काळातही भांडण होतं होती. पण त्याचबरोबर एकमेकांना समजून घेण्याची भूमिका स्पष्टपण मांडली जात होती. युती तुटली तर कसं नुकसान होईल हे सांगितलं होतं. देशात तुम्ही तर महाराष्ट्रात आम्ही अशा शब्दात त्यांनी जागा वाटपावरून बाजपला सुनावलं होतं. सध्या मात्र दोन्ही पक्षात राजकारण दिसून येतंय