अखेर भाजपने डाव साधला, शिंदे गटाला बाळासाहेब देवरसांचे नाव; नेटकऱ्यांनी शिंदे गटाला झोडपलं

केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गट आणि शिंदे गटाला नवे नाव दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आलेला आहे. अंधेरी पोटनिवडणूक जवळ आली असून दोन्ही पक्षाकडून नव्या राजकीय लढाईला जोरात सुरुवात झालेली आहे.आता या पुढे शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना गट म्हणून ओळख मिळालेली आहे. जेव्हा शिंदे गटाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली ओळख सांगितली तेव्हा वेगवेगळ्या प्रतिक्रिया शिंदे यांच्या पोस्टवर आल्या. मात्र काही कमेंट असे होते ज्यांनी चक्क शब्दाचां मारा करत शिंदे गटाला झोडपून काढले.

ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिवंगत नेते बाळासाहेब देवरस यांची असल्याचा एक मेसेज सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. अगदी त्याचे मिम्स सुद्धा शेअर करण्यात आले. नेटकऱ्यांनी तर शिंदे गटाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक दिवंगत बाळासाहेब देवरस यांचे नाव मिळाले, भाजपने डाव साधला असे सुद्धा मेसेज फिरत आहेत. अगदी सामनाच्या अग्रेलेखातही या मेसेजचा उल्लेख करण्यात आलेला आहे.

शिंदे गटाने सुचविलेल्या बाळासाहेबांची शिवसेना या नावाला निवडणूक आयोगाने मान्यता दिली. आपल्या नावात बाळासाहेबांचा उल्लेख असल्यामुळे शिंदे गटातील प्रत्येकालाच खूप आंनद झाला होता निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार असे द्वीट एकनाथ शिंदे यांनी केले होते. त्यावरून सोशल मीडियावर अनेकांनी शिंदे गटाचा जोरदार समाचार घेतला. ‘हे कुठले बाळासाहेब?’ बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब सामंत की बाळासाहेब कदम अशी खिल्ली उडवणारा मेसेज सुद्धा शिंदे यांना करण्यात आले होते. म्हणजेच काय तर आगामी काळात ही ठाकरे आणि शिंदे यांच्यात जोरदार संघर्ष पहायला मिळणार असून ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या नावावरुन राजकारण आणखी रंगत येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.