२२ सप्टेंबरपासून ‘या’ बँकेला कायमचं टाळं तुमच्या पैशांचं काय होणार?

महाराष्ट्रातील सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. RBI ने ऑगस्ट महिन्यात पुणे येथील रुपी सहकारी बँक लिमिटेडचा बँकिंग परवाना रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता.केंद्रीय बँकेच्या या निर्णयानुसार, 22 सप्टेंबरपासून या बँकेच्या सर्व सेवा कायमस्वरुपी बंद होणार आहे.रुपी सहकारी बँकेकडे पुरेसे भांडवल नसून कमाईचे आवश्यक साधनंही नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
22 सप्टेंबरपासून या बँकेचे कामकाज बंद होईल. ग्राहकांना रक्कम काढता येणार नाही. कोणताही आर्थिक व्यवहार, धनादेश वा इतर सेवांचा लाभ घेता येणार नाही.
रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 11(1) आणि कलम 22(3)(d) तसेच कलम 56 चे पालन करत नाही. कलम 22(3)(a), 22(3)(b), 22(3)(c), 22(3)(d) आणि 22(3)(e) च्या आवश्यकतांचे पालन करण्यात बँक अयशस्वी ठरली आहे. दरम्यान बँकेत ठेवी असणाऱ्या ठेवीदारांना बुडीत ठेवींच्या प्रमाणात ५ लाख रु. पर्यंतची रक्कम मिळणार आहे.