‘या’ कारणामुळे उध्दव ठाकरेंनाच शिवाजी पार्कवर परवानगी मिळण्याची शक्यता

शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटी नंतर राज्यातील महविकास आघाडी सरकार कोसळले आणि राज्यात या दोन गटांत विविध विषयांवरून संघर्ष चालू झाला आहे. गेल्या महिन्यापासून दोन्ही गट आपले आपले शक्तिप्रदर्शन करण्यावर भर देत होते आणि आता दसरा मेळाव्याच्या निमित्ताने हा संघर्ष रस्त्यावर पाहायला मिळत आहे.
बाळासाहेब ठाकरेंपासून शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा सुरू झाली ती आजतागायत आहे. गेल्या अनेक दिवांपासून चर्चा चालू आहेत की शिंदे गट सुद्धा दसरा मेळावा आयोजित करून उध्दव ठाकरेंवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहे.
पण आता नवीन माहिती समोर येत आहे ती म्हणजे, शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी उध्दव ठाकरेंनाच मिळण्याची शक्यता दाट शक्यता आहे. याबाबत मुंबई महानगरपालिकेच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, दरवर्षी ठाकरे दसऱ्याला मेळावा घेतात आणि ती त्यांची परंपरा आहे त्याप्रमाणे मेळाव्याची परवानगी ही ठाकरेंच्या शिवसेनेलाच मिळायला हवी.
मुख्यमंत्री स्वत्ता नगविकास खात्याचे मंत्री असल्याने तेही आपले वजन टाकण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे परवानगी नेमकी कोणाला मिळणार हे लवकरच कळेल.