आजवर अनेकांनी बीड मधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील घटनाक्रम सांगितला, त्याबद्दल भाष्य केलं पण सुरेश धस यांनी बीड हत्या प्रकरणाचा अतिशय तपशीलवार घटनाक्रम सांगून या पूर्ण घटनेची सर्वांना थक्क करून सोडणारी कहाणी सांगितली.
त्यामुळे नक्की सुरेश धस त्यांच्या भाषणात काय म्हणालेत तेच पाहुयात. सुरुवातीला सुरेश धस यांनी बीड प्रकरणातील अगदी सुरवातीपासूनचा घटनाक्रम सांगत, विष्णू चाटे याच्या या प्रकरणातील इन्व्हॉल्व्हमेंट बद्दल भाष्य केलं. तर पुढे यांचा कोण आका आहे? असा सवाल देखील उपस्थित केला. तर यावर विरोधकांना उत्तर देत तुमच्याप्रमाणे आम्ही देखील या आकाच्या शोधात आहोत असं सुरेश धस म्हणाले.
प्रकरणातील पुढील घटनाक्रम सांगताना सुरेश धस यांनी सुदर्शन घुले नामक इसमावर टीका केली व ज्याचं घर चार-पाच पत्र्याचं आहे तो स्कॉर्पिओ मध्ये कसा काय फिरू शकतो? त्याला स्कॉर्पिओ कोणी दिली हे शोधणं महत्त्वाचं आहे. असं म्हणत प्रश्न उपस्थित केला. या प्रकरणाबाबत पुढे बोलत असताना मी या सर्व प्रकरणाची माहिती घेतली आहे आणि त्यानुसार या सगळ्यांनी एक प्लॅन केला असं म्हणत सुरेश धस यांनी आरोपींचा काय प्लॅन होता ते सांगितलं. यापुढे सुरेश धस यांनी या प्रकरणातील सर्वांना हादरवून टाकणारी कहानी सांगितली.
तर बीड जिल्ह्यातील ज्या ज्या लोकांकडे पिस्तूल आहेत, त्या त्या लोकांचे पिस्तूल आपण काढून घ्यावे यासाठी अध्यक्षांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना विनंती केली. सुरेश धस यांनी त्यांच्या भाषणात या प्रकरणावरून ग्रामस्थांचा संताप का झाला, या मागील कारण देखील स्पष्ट केला आहे. अशाप्रकारे सुरेश धस यांनी बीड मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागील मनाला अतिशय वेदना देणारी कहानी सांगत, भावनिक पद्धतीने भाषण दिले.
तर यावर तुमचे मत काय? कमेंट करून नक्की सांगा