बीड मधील सरपंच संतोष देशमुख हत्येत परळीचे आमदार आणि महायुती सरकारमधील नवनिर्वाचित मंत्री धनंजय मुंडेंच्या जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड यांच्या नातेवाईकांचा हात असल्याचे आरोप केले जात आहेत. तर याबाबत बोलताना "वाल्मिक कराड माझे निकटवर्तीय आहेत तर आहेत" असं वक्तव्य धनंजय मुंडेंनी केलंय म्हणूनच धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय व बीड मधील सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आरोपी वाल्मिक कराड कोण आहेत? तेच जाणून घेऊयात
वाल्मीक कराड हे परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष होते. मागील दहा वर्षांपासून वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या मतदारसंघातील संपूर्ण कारभार वाल्मीक कराडच पाहतात. धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीत परळी मतदारसंघात वाल्मीक कराड नागरिकांच्या समस्या सोडवतात. तर वाल्मिक कराड यांचा इतिहास पाहता यापूर्वी देखील 307 सारख्या गुन्ह्यात वाल्मिक कराड यांचा समावेश असल्याचं सांगितलं जात. तर सध्याच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांच्या नातेवाईकांचा संबंध दिसून येत असून बीडच्या केज पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे.
संतोष देशमुख खून प्रकरणात विष्णू चाटे हा केज तालुक्यातील आरोपी आहे. जो धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांचा जवळचा मानला जातो. वाल्मीक कराड यांच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी सुद्धा त्यांच्यावर राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत. तर बीडमध्ये वाल्मिक कराडने शिंदे नावाच्या अधिकाऱ्याला घुलेच्या फोनवरून धमकी दिली. तसेच, घुलेच्या फोनवरून वाल्मिक कराडनं दोन कोटींची खंडणी मागितली. हाच घुले नामक इसम सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी आहे. मात्र, फक्त वाल्मिक कराड याच्यावर दोन कोटींच्या खंडणीचा गुन्हा दाखल केला. सरपंचचांच्या हत्या प्रकरणात कराडला का आरोपी केले जात नाही?” असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला होता.
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा संशय तेथील गावकऱ्यांनी देखील व्यक्त केला आहे असं म्हणत हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अंबादास दानवे यांनी देखील हे प्रकरण विधिमंडळात उचलून धरले. आणि वाल्मिक कराड यांचं नाव घेऊन थेट मंत्री धनंजय मुंडेंकडे बोट दाखवले होते.
तर यावर उत्तर देताना “एका तरुण सरपंचाचा खून करण्यात आला हे प्रकरण आम्ही गांभीर्याने घेतलं आहे. याप्रकरणात पीएसआय सस्पेंड आहे. तर, येथील पीआय अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवल आहे. आरोपी कुणाशी संबंधित आहे हे न पाहता जो आरोपी आहे, त्याला अटक केली जाईल. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली असून ते या प्रकरणाचा तपास करत आहेत. AI टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण या प्रकरणाचा शोध घेत आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी विधानपरिषदेत बोलताना सांगितलं आहे. तर यावेळी आरोपी मंत्र्यांचे जवळचे आहेत, असे बोलणं योग्य नाही असं सांगायला देखील फडणवीस विसरले नाहीत.
तर या सगळ्या प्रकरणावर तुमचे मत काय तर कंमेंट करून नक्की सांगा.