मेळाव्याआधी शिवसेनेला पडणार मोठं खिंडार; 4 आमदारांसह 3 खासदार शिंदे गटाच्या संपर्कात?

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर ठाकरे सरकार कोसळले आणि शिंदे सरकार सत्तेत आले. आपणच खरी शिवसेना हा वाद सुप्रीम कोर्टात असला तरी शिंदे गट आणि ठाकरे गट आपली ताकद वाढविण्यासाठी कठोर संघर्ष करताना दिसत आहेत. दरम्यान सत्तेत असलेले शिंदे सरकार वारंवार ठाकरेंना धक्का देण्याचा प्रयत्न करत आहे. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर दोघांमधील संघर्ष जोरदार उफाळला असून आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगलेला आहे.
अशातच आता शिवसेनेतील आणखी आमदार आणि खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा बुलडाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केलाय. शिवसेना फुटल्यामुळं आमदारांची गळती लागली असून शिंदे गटामध्ये दररोज जोरदार इन्कमिंग सुरूच आहे. शिवसेनेमध्ये उरलेल्या आमदारांपैकी 4 आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असून 3 खासदार देखील लवकरच शिंदे गटात सामील होणार त्यामध्ये एक मुंबईचा खासदार असेल असा दावा जाधव यांनी केलेला आहे.
मिलिंद नार्वेकर यांच्यासह 3 खासदार देखील शिंदे गटात सामील होणार असल्याचं जाधव म्हणालेत. समजा जाधव यांचा हा दावा खरा झाला तर शिवसेनेला दसरा मेळाव्याआधी मोठं खिंडार पडणार यात शंकाच नाही.