राज्यपालांच्या वक्तव्यानं वादंग !

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल (२९ जुलै) मुंबईमधील अंधेरी येथील दाऊद बाग जंक्शन चौकाच्या नामकरण सोहळ्यात मुंबई-ठाण्यामधील गुजराती आणि राजस्थानी लोकांबद्दल कौतुकाचे उद्गागार काढले पण हे बोलत असताना त्यांनी एक वादग्रत वक्तव्य केलं
काय म्हणाले राज्यपाल कोश्यारी?
या कार्यक्रमात बोलत असताना कोश्यारी म्हणाले, ‘कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की, मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. मात्र गुजराती आणि राजस्थानी लोकांना जर काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटली जाणार नाही.’
राज्यपालांच्या वक्तव्यावरून वादाला तोंड फुटलं असून विरोधकांनी टीकेची झोड लावलेली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकापाठोपाठ एक तीन ट्विट करत राज्यपालांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तर कोश्यारी माफी मागा असे म्हटले आहे
मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी ट्वीट करुन राज्यपालांवर घणाघाती टीका केली आहे. पुरे आता यांनी आता घरी बसावे. मराठी माणसाला ज्ञान पाजळण्याच्या भानगडीत पडू नये असे ट्विट मनसेने केले आहे.
काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भाषणाचा व्हिडिओ पोस्ट करून राज्यपालांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे.