र तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचाच होईल, एवढं नक्की झालं असून या विरोधी पक्षनेता पदाचे प्रमुख दावेदार कोण असतील? भास्कर जाधव विरोधी पक्षनेता होऊ शकतात का? तेच जाणून घेऊयात
मागील काही काळात, मार्च महिन्यात भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर असलेली त्यांची नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. 2019 मध्ये मला मंत्री पद दिले नाही, तरीसुद्धा मी पक्षात राहिलो. त्यानंतर शिवसेना फुटली, शिवसेना फुटल्यानंतर देखील मी उद्धव साहेबांची साथ दिली, तेव्हा मला गटनेता पद द्यायला नको होतं का? असे सवाल करत भास्कर जाधव यांनी त्यांची नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. त्या सोबतच या वेळी ते रडले देखील होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंचे हे शिलेदार उद्धव ठाकरेंवर नाराज असल्याच स्पष्ट झालं होतं.
उद्धव ठाकरेंवर जाहीरपणे नाराजी व्यक्त करून देखील भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही. लोकसभा, विधानसभा प्रत्येक निवडणुकीमध्ये भास्कर जाधव उद्धव ठाकरे व पक्षासोबत राहिले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांच्या कामाची दखल घेत, 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भास्कर जाधव यांची विधानसभेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते म्हणून निवड केली. तर काल भास्कर जाधव यांनी हिवाळी अधिवेशन गाजवल. त्यांच्या या भाषणातून अनेकांना त्यांच्यामध्ये एका दमदार विरोधी पक्ष नेत्याची छलक देखील दिसली. त्यामुळे सध्या विरोधी पक्ष नेता पदासाठी भास्कर जाधव यांचं नाव आघाडीवर राहण्याची दाट शक्यता आहे.
तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांच्यासोबतच विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू व बार्शी मतदारसंघाचे आमदार दिलीप सोपल हे देखील विरोधी पक्ष नेते पदासाठीच्या शर्यतीमध्ये दिसू शकतात. मात्र या चारही जणांचा विचार केला तर या सगळ्या मध्ये भास्कर जाधव यांचा राजकारणातील व सभागृहातील अनुभव मोठा आहे. यासोबतच त्यांची अभ्यासपूर्ण भाषण शैली, मुद्दा मांडण्याची पद्धत यामुळे भास्कर जाधव यांची विरोधी पक्ष नेता पदी वर्णी लागू शकते, असा अंदाज अनेक राजकीय विश्लेषक वर्तवतात.