भास्कर जाधव यांनी आजचं अधिवेशन चांगलंच गाजवलं. आपल्या भाषणाद्वारे सत्ताधाऱ्यांना हैराण करून सोडलं, तर अध्यक्षांची देखील यावेळी मोठी दैना झाली होती म्हणूनच भास्कर जाधव यांनी कशाप्रकारे आजचं हिवाळी अधिवेशन गाजवल ते पाहूयात.
सर्वात पहिलं भास्कर जाधव यांनी महायुती सरकारच्या स्थापनेवर प्रश्न उपस्थित केले. त्यासोबतच राज्यपालांच्या भूमिकेवर देखील भाष्य केले. भास्कर जाधव यांनी विरोधकांना देखील बोलण्यासाठी वेळ दिला आहे हे नमूद करत अध्यक्ष महोदयांना आपण असं काही करू नका असं, म्हणत पुढे त्यांचे भाषण चालू केले. शपथविधी सोहळ्या दरम्यान राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत महायुती सरकारवर निशाणा साधला.
पुढे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भूमिकेवर टीका करत भास्कर जाधव यांनी राज्यपालांच्या भाषणावर चर्चा करायला सुरुवात केली. मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा, शिवरायांचा जमीन दोस्त झालेला पुतळा या सगळ्या त्यांना हात घालत भास्कर जाधव यांनी हिवाळी अधिवेशन गाजवलं