शिंदे गटात मेगाभरती ! आदित्य ठाकरेंना मोठा धक्का

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यात सत्तांतर झालंय.शिवसेनेतील कार्यकर्त्यांपासून ते खासदारापर्यंत हळूहळू सर्वचजण एकनाथ शिंदे यांना आपलं समर्थन देऊ लागले आहेत. शिंदे गटात दररोज जोरदार इनकमिंग सुरु आहे त्यात कार्यकर्ते, नगरसेवक, आमदार, खासदार, पदाधिकारी शिंदे यांना साथ देताना दिसत आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांची ताकद वाढलेली आहे.
Maharashtra | A large number of Shiv Sena workers from Mumbai’s Worli area have joined the party’s Shinde faction at CM Eknath Shinde’s official residence pic.twitter.com/h2YsR8bdC6
— ANI (@ANI) October 2, 2022
आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी शिंदे गटाकडून जोरदार तयारी सुरू करण्यात येतेय. दुसरीकडे ठाकरे गट आपला पक्ष आणि कार्यकर्ते यांना एकत्र ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसत आहेत. दरम्यान शिंदे गटाने आदित्य ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा झटका दिलाय. वरळीमधील शेकडो शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला असून वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. त्यांच्याच मतदारसंघातील शेकडो शिवसैनिक आता शिंदे गटाच्या बाजूने आलेले आहेत. हा आदित्य ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय. ऐन दसरा मेळाव्याच्या तोडांवर शेकडो शिवसैनिक शिंदे गटात सामील झालेत.
शिंदे गटात प्रवेशासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर दाखल pic.twitter.com/uKtCnmme3D
— Times Now Marathi (@timesnowmarathi) October 2, 2022