वेदांतची नवी घोषणा, महाराष्ट्राला डिवचलं?

वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टरचा प्रकल्प शिंदे सरकराने गुजरातला पळवल्यामुळे राज्याचं वातावरण तापलेलं आहे. आरोप-प्रत्यारोप होत असताना रात्री उशीरा वेदांताबाबत मोठी बातमी समोर आली आहे. वेदांता कंपनी लवकरच महाष्ट्रात मोठी गुंतवणूक करणार आहे. याबाबत वेदांता प्रकल्पाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी ट्विट केले आहे. महाराष्ट्राने वेदांता प्रकल्पासाठी भरपूर प्रयत्न केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
आम्ही महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी कटीबद्ध आहोत. वेदांता कंपनी लवकरच महाष्ट्रात मोठी गुंतवणूक करणार आहे. गुजरातमधील प्रकल्प पुढे नेण्यासाठी महाराष्ट्र गुरुकिल्ली ठरणार आहे. महाराष्ट्राने वेदांता प्रकल्पासाठी भरपूर प्रयत्न केले मात्र गुजरात सरकारनं आमच्या अपेक्षा पूर्ण केल्या. अपेक्षा पूर्ण झाल्यानं प्रकल्प गुजरातला हलवण्याचा निर्णय घेतल्याचा उल्लेख वेदांता प्रकल्पाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी केला आहे. या ट्विटनंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अनिल अग्रवाल यांचे आभार मानले आहेत. आता यावर विरोधक काय म्हणतायेत ते पहावं लागेल.