शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टाची मोठी सुचना

खरी शिवसेना कोणाची यावरुन शिंदे आणि ठाकरे गटात वाद सुरु असून याबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला सुचना दिल्या आहेत. पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताच निर्णय नको तसेच दोन्ही बाजूचे म्हणणे मांडण्यासाठी जी मुदत दिली आही ती वाढवून द्या अशी सुचना सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिली आहे. सुप्रीम कोर्टात आाज झालेल्या सुनावणीमुळे शिवसेनेला मोठा दिलासा मिळालेला आहे. तुर्तास तरी शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. राज्यात सुरु असलेल्या सत्ता संघर्षांवर ८ ऑगस्टला अर्थात सोमवारी पुढील सुनावणी होणार आहे. 

सुप्रीम कोर्टात आज सुनावणी सुरु झाली तेव्हा शिवसेना गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तीवाद केला. शिवसेना आमचीच आहे असा दावा एकनाथ शिंदे करत आहेत मग ते निवडणूक आयोगाकडे का गेले असा प्रश्न विचारुन सिब्बलांनी शिंदेगटाला कोंडीत पकडलं. हे प्रकरण मोठ्या खंडपिठाकडे देण्यास सिब्बलांनी विरोध केला असून सुप्रीम कोर्टातच याचा निर्णय व्हायला हवा असं सिब्बलांनी सांगितलं. दरम्यान याबाबत कोर्ट निर्णय घेईल आणि हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे द्यायचे की नाही याबाबत सोमवारी निर्णय होईल असेही कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आले.

लिखित युक्तिवादांचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेऊ. निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी आणखी काही मुदत वाढवून द्यावी अशा सूचना कोर्टाकडून देण्यात आल्या आहेत.निवडणूक आयोगाने शिंदे गट आणि शिवसेनेला ८ ऑगस्टपर्यंत त्यांचे म्हणणं मांडण्याची संधी दिली होती. परंतु कोर्टात निर्णय लागत नाही तोवर पक्षाच्या चिन्हाबाबत कुठलाही निर्णय नको अशी सूचना सुप्रीम कोर्टाने दिली आहे. 

शिंदे गट म्हणतो आहे, ‘आमच्याकडे ४० आमदारांचा पाठिंबा आहे पण जर हे ४० आमदार अपात्र ठरले तर त्या दाव्याला काय आधार आहे असा सवाल देखील सिब्बल यांनी केला. संसदीय दलाचे 40 आमदार मूळ पक्ष आम्ही आहोत असा दावा कदापी करु शकत नाही.’ असे म्हणत कपिल सिब्बल यांनी कोर्टाला असेही निर्देशनास आणून दिले की संसदीय दल आणि पक्ष हे दोन्ही वेगवेगळे असतात. 

शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी असा युक्तीवाद केला ‘आम्ही वेगळ्या पक्षात गेलो नाही.आम्हीच शिवसेना आहोत मग आमदारांवर अपात्रकेची कारवाई कशी होवू शकते, आम्ही पक्ष सोडलेला नाही’ असं साळवे यांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.