उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा !!

एका पाठोपाठ एक धक्के बसणाऱ्या उद्धव ठाकरेंसाठी दिलासादायक बातमी आहे. निवडणूक आयोगाच्या नोटिशीविरोधात शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. ती याचिका कोर्टाकडून स्वीकारण्यात आली आहे. शिवसेनेच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने तयारी दर्शविले आहे त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा दिलासा मानण्यात येतो आहे.एकनाथ शिंदे गटाच्या याचिकेवरील निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती द्यावी, अशी मागणी शिवसेनेने केली होती. सुप्रीम कोर्ट १ ऑगस्टला इतर याचिकांसह शिवसेनेच्या या मागणीवरही सुनावणी घेणार आहे.
बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत खरा शिवसेना पक्ष कोणता हे निवडणूक आयोग ठरवू शकत नाही असे उद्धव गटाने म्हटले आहे. दरम्यान एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांना शिवसेनेवरील दाव्यासंदर्भातील कागदपत्रे ८ ऑगस्टपर्यंत दाखल करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिला होता पण या आदेशालाच उद्धव ठाकरे यांच्या गटाने आव्हान दिले होते. निवडणूक आयोगाचा आदेश म्हणजे घाईघाईने घेतलेला आणि असंवैधानिक निर्णय आहे असे उद्धव ठाकरे गटाचे म्हणणं होते.शिवसेनेचे सरचिटणीस सुभाष देसाई यांनी ही याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाने अखेर या याचिकेवर सुनावणी घेण्यास होकार दिलेला आहे.