आदित्य ठाकरेंना मोठा धक्का !!

मोठ्या संख्येने युवा सेनेतील युवक – युवतींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं समर्थन करण्याचं ठरवलं. युवा सेना सचिव आणि माजी नगरसेवक पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा जाहीर केला. नंदनवन या शिंदेच्या शासकीय निवासात हे युवक – युवती जमले होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि स्व. आनंद दिघे यांची शिकवण अंगीकारून एकनाथ शिंदे यांनी राज्यात सत्तांतर घडवून आणले. त्यांना मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत आहे. आधी ठाणे त्यानंतर कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर, उल्हासनगर येथील अनेक नगरसेवकांनी शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला. भिवंडी, मुरबाड, शहापूर, वसई-विरार, पालघर या पट्ट्यातील अनेक नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य हेही शिंदे यांच्या गटात सामील झाले. ठाणे जिल्ह्यातल्या बहुतांश युवक – युवतींनी ज्या युवासेनेत होत्या त्यांनी एकनाथ शिंदेंच्या गटात येण्याचा निर्णय घेतला.
राज्यातील युतीचे सरकार युवक-युवती यांचे शिक्षण, रोजगार आदी प्रश्न तातडीने सोडवून त्यांना न्याय मिळवून देईल, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, युवासेना विस्तारक राहुल लोंढे, पदाधिकारी निखिल बुडजडे, विराज महामुणकर, पूर्वेश सरनाईक, आमदार प्रताप सरनाईक व अन्य हजार होते.