पुण्यातील ‘त्या’ शिबीराबद्दल मोठी अपटेड!

पुण्यात सेक्स तत्रं शिबिराची जाहिरत सोशल मिडियात व्हायरल झाल्यानंतर सगळीकडे एकच धुमाकूळ माजला होता. मनसेसह हिंदुवादी संघटनांनी पुणे पोलिसाच धाव घेवून यावर जोरदार निशाणा साधला होता. या गदारोळानंतर पुण्यातील सेक्स तंत्र शिबिर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय पुणे पोलिसांनी ही माहिती दिली आहे.
उत्तर प्रदेशमधील सत्यम शिवम सुंदरम फाऊंडेशनतर्फे या शिबीराचं आयोजन करण्यात येणार होतं. मात्र या कार्यक्रमात ज्या काही गोष्टी होणार होत्या त्याला आक्षेप घेण्यात आले. सेक्स तंत्राचा संबंध नवरात्रीशी जोडण्यात आला होता. एक वेगळं स्वरुप या कार्यक्रमाला देण्यात आलं होतं. या शिबिराला मोठा विरोध झाला आणि पुणे पोलीस आयोजकांपर्यंत पोहोचले त्यांनी कारवाईचा इशारा दिला अखेर आयोजक बॅकफूटवर आले आणि त्यांनी कार्यक्रम रद्द केला.
नवरात्रीच्या काळात पुण्यात ‘सेक्स तंत्र’नावाने तीन दिवसांचा एक कोर्स आयोजित करण्यात आला आहे अशी ती जाहिरात होती. 1, 2 आणि 3 ऑक्टोबर असे तीन दिवस पुण्यातील कॅम्प भागात हा कोर्स आयोजित करण्यात येणार होता. मात्र जाहिरात व्हायरल झाल्यानंतर विद्येच्या माहेरघरात काय सुरु आहे अशी चर्चा सुरु झाली. पुणेकरांनीही याबद्दल संताप व्यक्त केला अखेर ते शिबीर रद्द करण्यात आले आहे.