‘बिग बॉस मराठी ४’ ला होस्ट मिळाला !

बिग बॉस मराठी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदा बिग बॉस मराठीचे चौथे पर्व आहे. या शोचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांची उत्सूकता अधिक वाढलेली आहे. दरम्यान बिग बॉस मराठीचा चौथा सीझन कोण होस्ट करणार अशी चर्चा सुरु झाली होती. अखेर या सीझनचा सुत्रसंचालक ठरलेला आहे. कलर्स वाहिनीने नवा टीझर रिलीज केला असून बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनसाठी महेश मांजरेकरच सुत्रसंचालन करणार आहेत. बिग बॉस मराठीसाठी होस्ट बदलेला नाही असे कलर्स वाहिनीकडून जाहिर करण्यात आलेले आहे. कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याची घोषणा करण्यात आली असून महेश मांजरेकर यात दिसत आहेत. 

“वर्गात विद्यार्थी नवे असतात, पण मास्तर तोच. महेश वामन मांजरेकर. असे महेश मांजरेकर बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनच्या टीझरमध्ये बोलताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी बीग बॉस मराठीसाठी नवा सुत्रधार येणार अशी चर्चा रंगलेली होती. मात्र कलर्स वाहिनीने टीझर रिलीज करून महेश मांजरेकरच होस्ट करणार हे स्पष्ट केलं आहे. 


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.