‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा होस्ट ठरला? ‘या’ अभिनेत्याच्या नावाची चर्चा

मराठी बिग बॉस शो देखील हिंदी शो प्रमाणे लोकप्रिय झालेला आहे. स्पर्धकांमधील भांडणे, टास्क, नातेगोती-मैत्री याची सर्वात जास्त चर्चा प्रेक्षकांमध्ये होत असते. मराठी बिग बॉसचे तीनही पर्व हीट ठरल्यानंतर आता चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. पण या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कोण करणार यावर चर्चा सुरु झाली आहे. तिन्ही भागांचे सुत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केले होते मात्र आता चौथ्या भागाचे सुत्रसंचालन ते करणार नाहीत असे बोलले जाते आहे. त्यामुळे आता सुत्रसंचालन कोण करणार याची सगळ्यांना उत्सूकता लागलेली आहे. नुकताच बिग बॉस मराठीचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.
दरम्यान बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वासाठी एका प्रसिद्ध अभिनेत्याचे नाव चर्चेत आहे ते म्हणजे सिद्धार्थ जाधव. त्याने विविध भूमिका साकारलेल्या आहेत आणि मराठीमधील एक आघाडीचा अभिनेता म्हणून तो ओळखला जातो. मराठी सोबत हिंदीमध्ये त्याने चांगल्या भूमिका केलेल्या आहेत.त्यामुळे सिद्धार्थ जाधव लवकरच बिग बॉस मराठीचे सूत्रसंचालन करेल असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे.पण अद्याप याकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच सिद्धार्थनेही याबाबत काहीही खुलासा केलेला नाही. त्यामुळे तो नक्की हे पर्व होस्ट करणार की नाही याबद्दल विविध तर्क-विर्तक सुरु झाले आहेत.