तारीख ठरली ! कधीपासून सुरु होतंय बिग बॉस मराठी ४

बिग बॉस मराठीचे चौथे पर्व कधी सुरु होते असे प्रश्न चाहते विचारत होते. दरम्यान बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनची तारीख जाहीर करण्यात आलीय. बिग बॉस मराठीचे होस्ट महेश मांजरेकर आणि कलर्स मराठी वाहिनीने या नव्याकोऱ्या पर्वाचा नवा प्रोमो शेअर केलाय.
या पोस्टनुसार बिग बॉस मराठी ४ हा सीझन ०२ ऑक्टोबर २०२२ पासून सुरू होतोय. या पोस्टमध्ये असंं म्हटलं आहे की, ‘१०० दिवसांचा हा खेळ. कधी पास, कधी फेल. पण महेश सरांच्या मते, यंदा All is well. पाहायला विसरू नका BIGG BOSS मराठीचा Grand Premiere २ ऑक्टोबरला संध्या ७ वा, सोम – शुक्र रात्री १० वा, शनि- रवि रात्री ९.३० वा फक्त कलर्स मराठीवर!’
बिग बॉस मराठी ४ विषयी माहिती देणारी पोस्ट महेश मांजरेकर यांनी शेअर केली असून १०० दिवसांचा हा खेळ. कधी पास, कधी फेल. पण महेश सरांच्या मते, यंदा All is well असे म्हणत शोची माहिती दिलीय.चॅनेलकडून शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये महेश यांचा हटके अंदाजही पाहायला मिळतोय.