उपराष्ट्रपती न केल्याने युती तोडली? मोदींच्या दाव्यावर नितीशकुमार म्हणाले…

बिहारमध्ये सत्तांतर झाल्यानंतर भाजपचे खासदार सुशील मोदी यांनी केलेलं एक विधान खूप चर्चेत आलं होतं. उपराष्ट्रपती न केल्यानेच नितीशकुमार एनडीएतून बाहेर पडले असा दावा मोदी यांनी केला होता. मोदींचा हा दावा नितीशकुमार यांनी फेटाळून लावलेला आहे.माझी अशी कोणतीही इच्छा नव्हती असे नितीशकुमार यांनी प्रसारमाध्यमांबरोबर बोलताना स्पष्ट केलंय. हा एक विनोद आहे असा टोलासुद्धा त्यांनी लगावला. 

उपराष्ट्रपतीपद अशी कोणतीही माझी इच्छा नाही. आम्ही त्यांच्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला आम्ही कितपत पाठिंबा दिला हे विसरले का? असे म्हणतं त्यांना हवं तितकं बोलू द्या असंही नितीशकुमार म्हणाले.

नितीशकुमार यांनी भाजपासोबत युती तोडून आरजेडीला हाताशी धरून बिहारमध्ये पुन्हा सरकार स्थापन केलं आहे. या नव्या सरकारमध्ये नितीशकुमारांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. भविष्यात राष्ट्रीय राजकारणात सहभागी होण्यासाठी नितीश कुमार यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. तर नितीशकुमारांनी मतदारांचा अपमान केला असा आरोप भाजपने केलेला आहे. उपराष्ट्रपती न केल्याने युती तोडली? मोदींच्या दाव्यावर नितीशकुमार म्हणाले…

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.