आशिष शेलारांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल !

सोशल मीडियावर सध्या भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय. शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी हा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये आशिष शेलार यांच्या भाषणातला काही भाग दाखवण्यात आलाय. शेलार आपल्या भाषणात, कुरेशी जर हाजी अराफत सारखा असेल, कुरेशी प्रामाणिकपणे काम करणारा, कोणालाही न घाबरणारा आणि फक्त देवापुढे नतमस्तक होणारा असेल तर आजपासून आशिष शेलारही कुरेशी आहे असं म्हणताना दिसतायेत.
शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी हा व्हिडीओ ट्विट करताना मतांसाठी आम्ही जात, धर्म, गोत्रही बदलायला तयार आहेत. शेलारांचे कुरेशी बनायलाही तयार आहेत असं म्हटलंय.काँग्रेसकडूनही या व्हिडीओवरुन शेलारांवर निशाणा साधण्यात आलाय.महाराष्ट्रातल्या जनतेलाही शेलार यांचं भाषण आणि त्यांनी केलेलं नामकरण आवडलं का, असं काँग्रेसने विचारलंय.
मला @ShelarAshish यांचे हे भाषण व स्वतः चे केलेले नवीन नामकरण आवडले.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 12, 2022
आपल्याला आवडले का? pic.twitter.com/hs37fW0o7u