भाजप-शिंदे युतीचे उमेदवार मुरजी पटेल किती कोटींचे मालक?

राज्याचं लक्ष सध्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीकडे लागलेले आहे. शिंदेंनी आपला उमेदवार दिलेला नसला तरी भाजपला साथ देत ठाकरेंना जोरदार टक्कर देत आहेत. या निवडणुकिमुळे भाजप आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे दोन पक्ष आमने-सामने आले आहेत.आता अधिकृतपणे प्रचार सुरु झालेला आहे. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्ष युतीचे उमेदवार मुरजी पटेल तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार म्हणून ऋतुजा लटके यांनी अर्ज दाखल केला आहे.तेव्हा त्यांनी निवडणूक आयोगापुढे आपल्या संपत्तीचं विवरण सादर केलंय. यानुसार भाजपचे उमेदवार मुरजी पटेल हे कोट्याधीश आहे.

मुरजी पटेल यांच्याकडे १ लाख ५ हजार रुपये तर त्यांच्या पत्नी केशरबेन पटेल यांच्याकडे ५० हजार ४११ रु. रोख रक्कम आहे. मुरजी पटेल यांच्याकडे २५ हजार २७५ रु. तर केशरबेन यांच्याकडे २ लाख ९८ हजार बँक डिपॉझिट आहे. मुरजी पटेल यांच्याकडे १ लाख ५० हजार रु. शेअर्स आहेत पण पत्नीच्या नावे शेअर्स नाही. मुरजी पटेल यांची पोस्टल सेव्हिंग नाही पण पत्नीच्या नावे ८१ हजार ४६९ एवढी पोस्टल सेव्हिंग आहेत. मुरजी पटेल यांनी ५१ लाख, ५५ हजार रु.दुसऱ्याला कर्ज म्हणून दिली आहे तर पत्नीने मुरजी पटेल यांना ५६ लाख ९० हजार दिलेले आहेत. मुरजी पटेल यांच्या नावावर इन्होव्हा तर पत्नीच्या नावावर फॉरच्युर्नर कार आहे. मुरजी पटेल यांच्याकडे कोणतेही दागदागिने नाहीत पण पत्नीकडे ७६ हजारांचे दागिने आहेत. पटेलांची एकूण जंगम मालमत्ता ६३ लाख ९६ हजार आहे. तर पत्नी केशरबेन यांची ६५ लाख ८१ हजार आहे.

गुजरातमधील कच्छ येथे मुरजी पटेल यांच्या नावावर ३० एकर तर पत्नी केशरबेनच्या नावावर ३० एकर जमीन आहे. मुरजी पटेल यांच्या नावावर असणाऱ्या जमिनीची किंमत २ कोटी २५ लाख तर पत्नीच्या नावावर असणाऱ्या जमिनीची किंमत २ कोटी आहे. मुरजी पटेल यांची अंधेरीत ३ घरे आहेत त्यात मुरजी पटेल यांचा ३ कोटी १६ लाख तर पत्नीचा ३ कोटी रु. हिस्सा आहे. मुरजी पटेलांची स्थावर मालमत्ता ५ कोटी ४१ लाख ७१ हजार तर पत्नी केशरबेन यांची स्थावर मालमत्ता ५ कोटी आहे. कोट्यधीश असणारे मुरजी पटेल नववी पास आहेत असे त्यांनी निवडणूक आयोगाच्या प्रतिक्षापत्रात लिहून दिलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.