शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीवर भाजपाचा टोला !

विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन संपलं आणि शिवसेनेकडून मोठी बातमी समोर आली. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा करण्यात आली आहे. खुद्द उद्धव ठाकरेंनीदेखील या युतीचं स्वागत केलं असून मराठ्यांना असलेल्या दुहीच्या शापालाच आपण गाडून टाकू असे उद्धव ठाकरे या पत्रकार परिषदेत म्हणाले. यावर भाजपकडून खोचक प्रतिक्रिया आलेली आहे.
संभाजी ब्रिगेडने २०१९ मध्ये ४० जागांवर निवडणूक लढवली. त्यांना ०.०६ टक्के मतं मिळाली. उद्धव ठाकरेंना इतकी कमी मतं मिळवणाऱ्या पार्टनरसोबत युती करावी लागतेय. महाराष्ट्रातील कोणताही पक्ष त्यांच्याशी युती करायला तयार नाही. त्यांच्यासोबतचे मित्र त्यांना सोडून पळून जातील. संभाजी ब्रिगेडसोबत जाऊन काही होणार नाही. ते महाराष्ट्राला आव आणून सांगत आहेत. पण हा काळ त्यांच्यासाठी अत्यंत वाईट आहे या शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीकास्त्र सोडलं आहे. या युतीची आम्हाला भीती नाही, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस असे बॅट्समन आहेत की जेव्हा क्रिकेटचा खेळ सुरू होईल, एवढे चौकार आणि षटकार लागणार आहेत की महाविकास आघाडी, संभाजी ब्रिगेड असे सगळे गारद होतील आणि प्रचंड बहुमताने खूप धावा करून आम्ही ही मॅच जिंकू असेही बावनकुळे म्हणालेत.