भाजपच्या ‘या’ नेत्याने उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचले !

यंदाच्या गणेशोत्सवात राजकीय किनार पहायला मिळाली. अगदी केंद्रातले नेतेसुद्धा गणपती दर्शनासाठी आले होते. दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर गणपती बाप्पांचं मोठ्या थाटात विसर्जन करण्यात आलं. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे निर्बंधात साजरा झालेला उत्सव यावेळी मात्र निर्बंधमुक्त आणि मोठ्या जल्लोषात साजरा झाला. उत्सवात यावेळी राजकीय रंग देखील पाहायला मिळाला. सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून गणेश दर्शनाच्या माध्यमातून मंडळांना भेटीगाठी दिल्या गेल्या. भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी अशा आशयाचं ट्विट केलं.
पण फक्त एव्हढं ट्विट करुन मोहित कंबोज थांबले नाही तर त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधलाय. अनंत चतुदर्शीच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी मोहित कंबोज यांनी उद्धव ठाकरे यांनी यावेळी गणेशोत्सव असो किंवा दहीहंडी दोन्ही सणांच्या शुभेच्छा जनतेला दिल्या नाहीत याची आठवण करुन दिली आहे.
निर्बंधमुक्त उत्सवाच्या पार्श्वभूमीवर यावेळी राज्यात सार्वजनिक मंडळांकडून मोठ्या जल्लोषात विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या. तब्बल २३ तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन गिरगाव चौपाटीवर करण्यात आलं.