‘नितीन गडकरीं’च्या ट्विटर पोस्टवरून राजकारण !!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सध्या कारमध्ये 6 एअरबॅग्ज असाव्यात यावर जोर देतायेत. त्यांनी रस्ते सुरक्षा अभियानासंदर्भातील एक व्हिडिओ शेअर केलाय. ‘6 एअरबॅग असलेल्या गाड्यांमध्ये प्रवास करा आणि आपले जीवन सुरक्षित करा’ असं लिहीलंय.या व्हिडिओचा संबंध हुंडा प्रथेशी जोडला जात असून त्यात दिसणार अभिनेता अश्रय कुमारही यूजर्सच्या निशाण्यावर आलाय.

या व्हिडिओमध्ये एक कुटुंब आपल्या मुलीला लग्नानंतर निरोप देताना दिसतात. तेवढ्यात अक्षय कुमार तेथे येतो आणि त्यांना जावई तसेच मुलीच्या सुरक्षिततेबद्दल अलर्ट करतो. तिचे वडील गाडीची वैशिष्ट्ये सांगायला लागतात. यातच अक्षय कुमार 6 एअरबॅग्जबद्दल विचारतो आणि नंतर ती कार बदलली जाते.

या व्हिडिओवरून शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी, ‘या जाहिरातीत समस्या असल्याचे म्हणत, असे क्रिएटिव्ह कोण पास करतं? असा प्रश्न विचारलाय.भारत सरकारकडे अधिकृतरित्या हुंडा प्रथेला प्रोत्साहन देताना पाहणे वाईट आहे, असे तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता साकेत गोखले यांनी म्हटलंय.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.