CM शिंदेंना शेवटचं स्थान, राष्ट्रवादीकडून टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व राज्याचे मुख्यमंत्री या बैठकिला उपस्थित होते. यावेळी शिंदे यांनी १८ हजार कोटी रुपयांच्या विकास कामाचे प्रस्ताव दिले आहेत. दरम्यान नीती आयोगाच्या बैठकित मुख्यमंत्री शिंदे यांना योग्य स्थान न दिल्याता दावा राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी केला आहे. त्यासाठी रोहीत पवार यांनी एक फोटो फेसबुक आणि ट्विटरवर शेअर केला आहे. नीती आयोगाच्या बैठकित उपस्थित असलेल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांसह हा फोटो काढण्यात आलेला आहे.यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे शेवटच्या रांगेत उभे असलेले दिसत आहेत.

हा फोटो शेअर करुन रोहीत पवार यांनी नाराजी व्यक्त केली असून एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल,अशी अपेक्षा करूयात! असे म्हटलेले आहे.फेसबुकवर रोहीत पवार यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. प्रत्येक मराठी माणसाचा स्वाभिमान दुखावणारा  फोटो. शिंदे साहेब वाईट वाटले असे मिटकरींनी म्हटले आहे.

 रोहित पवार यांच्या या टीकेला ‘सत्तेत नसल्याचं दुखणं बाहेर येत आहे,’ असे प्रत्यूत्तर भाजपचे आमदार राम कदम यांनी दिले आहे. तर भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले आहेत, ‘काही अपमान करण्याचा उद्देश नाहीये, आता यांना मराठी माणसांचं पडलं आहे, आताप्रर्यंत कॉंग्रेस दिल्लीच्या तख्तापुढं पाणी भरायचं तेव्हा कुठं गेला होता यांचा स्वाभिमान. उद्या नीती आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्राला शिंदे आणि फडणवीस यांच्या माध्यमातून विकास निधी येईल, तेव्हा त्यांना कळेल महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं हितं कसं सांभाळलं जातं.’  केंद्रात मुख्यमंत्र्यांना दिलेल्या वागणुकीवर अनेकांकडून केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.