उद्या ‘पितृपक्ष’ संपणार… उद्धव ठाकरेंच्या जिव्हारी लागणारी टीका कुणाची?

उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्याईवर जगणारे बांडगुळं आहेत. ते कर्तव्यशून्य आहेत, अशी थेट टीका दोन दिवसांपूर्वी मनसेकडून करण्यात आली होती. त्यानंतर आता भाजपकडून उद्धव ठाकरेंकडे सूचक वक्तव्य करण्यात आलंय. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्या पितृपक्ष संपणार असं ट्विट केलंय. भाजपकडून हा इशारा उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला देण्यात आलाय.
उद्या ‘पितृपक्ष’ संपणार…
— Keshav Upadhye (@keshavupadhye) September 24, 2022
हायकोर्टानं उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल दिल्या त्यामुळे शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच आवाज घुमणार हे स्पष्ट आहे. सध्या शिंदे गटात अस्वस्थता असल्याचं म्हटलं जातंय. शिंदे गट सुप्रीम कोर्टातही धाव घेण्याच्या तयारीत आहे. अशातच भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेच्या जिव्हारी लागणारी टीका केलेली आहे.
उद्धव ठाकरे यांना जे काही मिळालेलं आहे ते फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईमुळेच आहे अशी टीका अनेकदा झालेली आहे. वडिलांमुळेच शिवसेनेचा वारसा उद्धव ठाकरेंना मिळाला असंही उघड बोललं जात पण आज भाजपकडून केलेली टीका उद्धव ठाकरे यांना जिव्हारी लागण्याची दाट शक्यता आहे. आता या टीकेला उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात काय उत्तर देतात ते पहावं लागणार आहे.