शिंदे गटाच्या आमदारांना जुनीच खाती ! बंड करून नेमकं काय साधलं?

शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार ४० दिवसांनी मंगळवारी संपन्न झाला. आता खातेवाटपाबद्दल उत्सुकता राहीलेली आहे. दरम्यान अशी माहिती हाती आलेली आहे की भाजपने महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवलेली आहेत. तर शिंदे गटाला तुलनेने कमी खाती देण्यात आलेली आहेत. त्यामुळे शिंदे यांनी जो बंड केला तो नक्की कशासाठी होता, कमी आणि जुनी खाती देवूनच भाजपने शिंदे गटाच्या तोंडाला पानं पुसली आहेत असे म्हटले जाते आहे.
माहितीनुसार असे समजते आहे की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वित्त तसेच गृह खाते देण्यात येणार आहे. ते उपमुख्यमंत्री असले तरी आमदारांना देण्यात येणारा निधी तसेच गृहखात्याच्या माध्यमातून महत्त्वाच्या प्रकरणाबाबत घेण्यात येणारे महत्त्वाचे निर्णय त्याचा अधिकार फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवलेला आहे. भाजपच्या नेत्यांना महसूल, जलसंपदा, ग्रामविकास आणि सार्वजनिक बांधकाम अशी खाती दिली जाणार आहेत अशी चर्चा आहे.
एकनाथ शिंदे स्वतःकडे नगरविकास, सामान्य प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) ही खाती ठेवतील अशी चर्चा आहे. तर उदय सामंतांना उद्योग तसेच उच्च आणि तंत्रशिक्षण हे खाते मिळू शकते. एकूणच काय तर शिवसेनेसोबत बंड केल्यांनतर या आमदारांना म्हणावा तसा फायदा झालेला नाही.शिंदे गटातील बहुतेक आमदारांना जुनी खाती आणि त्याचा कारभार पहावा लागणार आहे. फक्त अब्दुल सत्तार आणि शंभुराज देसाई यांना राज्यमंत्रीपदावरून कॅबिनेट मंत्रीपदाची बढती मिळालेली आहे. हाच तो काय महत्त्वाचा फायदा शिंदे गटाला झालेला आहे. एवढा मोठा राजकीय धोका पत्करून, बंडखोरी करुन आमदार शिंदेगटाकडे आले पण खातेवाटप पाहता यातून नक्की त्यांनी काय साधलं हाच मोठा प्रश्न पडेलेला आहे.