भाजपाचा नितीश कुमारांना जबर धक्का !!

बिहारमध्ये नितीशकुमारांनी युती तोडली आणि आरजेडीसोबत महाआघाडीत सामील होऊन नव्याने सरकार स्थापन केले. आता मणिपूरमध्येही नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडचे आमदार सरकारला असलेला पाठिंबा काढून घेणार असल्याची चर्चा रंगलेली होती. मात्र प्रत्यक्षात राज्यातील जेडीयूच्या ६ पैकी पाच आमदारांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केलाय. नितीश कुमारांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय.
विधानसभेच्या सचिवांनी या संदर्भामध्ये एक नोटिफिकेशन प्रसिद्ध करून विधानसभेच्या सर्व सदस्यांना याची माहिती दिलीय, त्यात भारतीय राज्यघटनेच्या दहाव्या शेड्युल अन्वये हे पाच आमदार आता भाजपाचे सदस्य असतील असे म्हटले आहे.नितीश कुमार यांनी मणिपूरमधील भाजपा सरकारला असलेला पाठिंबा काढून घेण्याचे संकेत दिल्यानंतर हे आमदार पक्ष सोडून भाजपामध्ये दाखल झाले आहेत.