शिंदे-भाजपची निवडणुकिसाठी तिहेरी रणनीती? मनसेची पडद्यामागून मदत !

महापालिका निवडणुकिच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. दरम्यान शिंदे गट आणि भाजप यांनी निवडणुकिसाठी तिहेरी रणनीती आखण्याची तयारी केलेली आहे अशी माहिती हाती आलीय.शिवसेनेला धक्का देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस सज्ज झालेत. 

भाजप आणि शिंदे गट एकत्र युती करुन निवडणुकीला सामोरे जाणार हे ठरलेलच आहे पण मनसेशी थेट युती करणं या दोघांनी टाळलं आहे अशी माहिती सुत्रांनी दिलीय.विरोधकांचा समाचार घेण्यासाठी हेतूपुर्वक मनसेचे स्वातंत्र्य अबाधित राखलं जाणार आहे असे सांगितले जाते आहे. त्यामुळे शिंदे आणि फडणवीस यांना पडद्यामागून मनसे मदत करणार अशा चर्चा आता होत आहेत. मनसेने एकला चलो रे हा नारा दिलेला आहे. 

मनपा निवडणुकित ठाकरेंना मात देण्यासाठी शिंदे-फडणवीस यांच्याकडून ही व्यूहरचना करण्यात आलेली आहे. एकूणच मनसेला थेट सोबत न घेता विरोधकांना दणका देण्यासाठी ठेवल्याची रणनिती आखण्याचा प्रयत्न शिंदे आणि भाजप यांच्याकडून केला जात असल्याचं पहायला मिळतंय.राज्यातील सत्तासंघर्षानंतर यंदाची निवडणुक ठाकरे आणि शिंदे गटासाठी विशेष महत्त्वाची आहे कारण त्यावरुनच त्यांचे अस्तित्व ठरवण्यात येणार आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.