BMC निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसली !

मुंबई महानगरपालिका निवडणूकीची तयार सुरु झाली आहे. प्रत्येक राजकीय पक्ष जय्यत तयारी करतोय.गेल्या काही दशकापासून मुंबई महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व आहे ते शिवसेनेच. मात्र यंदाची निवडणूक शिवसेनेसाठी सर्वाधिक आव्हानात्मक ठरणार आहे. शिंदेंनी केलेला बंड, आमदार, खासदार अगदी नगरसेवक, गटनेते यांनी सोडलेली साथ, खरी शिवसेना कोणाची यामुळे कोर्टात सुरु असलेली लढाई यामुळे बीएमसीची निवडणूक अटीतटीची होणार याच शंकाच नाही. 

शिवसेनेला पुन्हा उभारी देण्यासाठी ठाकरे कुटुंबिय जोरदार प्रयत्न करतंय. या पार्श्वभूमीवर आगामी बीएमसीच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसली आहे. आज (१२ ऑगस्ट) शिवसेना भवन येथे पक्षाच्या माजी नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आली होती. आगामी निवडणुकिवर विचारमंथन आणि रणनीती करण्यात आलीय असे बोलले जातेय. मातोश्रीवर गेल्या काही दिवसांपासून विविध स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात येत आहे. त्याअंतर्गतच आजची माजी नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आली होती. 

बीएमसीच्या निवडणुकीत शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह नक्की कोणाला मिळणार, याबाबत अजूनही काही निश्चित झालेलं नाही. पण शिवसेनेला पुन्हा एकदा बीएमसीवर भगवा फडकवायचा आहे. मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद काय आहे ते पुन्हा दाखवून द्यायचे आहे. आदित्य ठाकरे यांनी देखील शिवसेना शाखांना भेटी देवून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करायला सुरुवात केलीय. पक्षसंघटना कायम ठेवण्यासाठी तसेच मुंबईच्या बालेकिल्ल्यावर भगवा फडकविण्यासाठी ठाकरे प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसतायेत. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.