रिचा चड्ढा-अली फजलच्या लग्नाचं वेडिंग कार्ड पाहिलं का?

बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अभिनेता अली फजल यांच्या लग्नाच्या चर्चा सध्या रंगलेली आहे. अनेक दिवसांपासून लिव्हइनमध्ये राहाणारे हे दोघं लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाचं ठिकाण समोर आल्यानंतर आता त्यांच्या लग्नाचं कार्ड समोर आलं आहे. यांच्या लग्नाचं कार्ड अनोखं असून त्याची सगळीकडे चर्चा होतेय.

रिचा चड्ढा-अली फजलच्या लग्नाचं वेडिंग कार्ड रेट्रो थीमवर आधारित आहे. हे कार्ड एका माचिसच्या बॉक्ससारखं दिसत असून त्यावर रिचा आणि अली सायकलवर बसलेले असल्याचं एक स्केच आहे आणि त्यावर ‘कपल मॅचेस’ असं लिहिलेलं आहे. रिपोर्ट्सनुसार, रिचा आणि अली यांचं लग्न ४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. हा विवाहसोहळा दिल्लीमधील जिमखाना क्लबमध्ये होणार असून त्यानंतर दिल्ली आणि मुंबईत एक ग्रँड रिसेप्शन दिलं जाणार आहे अशी माहिती समोर आलीय. रिचा सध्या  ‘हीरामंडी’ सिनेमाचं शूटिंग करतेय तर अली फजल सुपरहिट वेब सीरिज ‘मिर्जापूर’च्या तिसऱ्या सीजनच्या शूटिंगमध्ये बीझी आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.