अमित शहा आणि रोहीत शेट्टी भेट, भेटीचे कारण….

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुंबई दौरा महापालिका निवडणुकिच्या पार्श्वभूमीवर खूपच महत्त्वाचा मानला जातोय. त्यांनी मुंबईत येताच निर्माता आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांची भेट घेतली. या भेटीमुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलीय.
अमित शाह यांनी त्यांच्या ट्विटरवर शेट्टी यांच्याबरोबर झालेल्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत.मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार,रोहीत शेट्टी आणि मीडिया डायरेक्टर अमित वाधवानी दिसत आहेत. ही भेट का झाली याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही पण रोहित शेट्टीची एन्ट्री म्हणजे काही मोठा धमाका होणार असं बोललं जातंय.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी काही वेळेपूर्वी लालबागच्या राजाचे दर्शनही घेतले आहे. त्यानंतर ते भाजपच्या महत्वाच्या नेत्यांच्या घरी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. यासगळ्यात रोहित शेट्टीनं त्यांची घेतलेली भेट ही एका खास कारणासाठी असल्याचे बोलले जातेय. नेटकऱ्यांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्यात. रोहित आता तू राजकारणात तर येत नाहीस ना, देशाच्या गृहमंत्र्यावर चित्रपट तर तयार करत नाहीस ना, अशी विचारणा होतेय.