‘लायगर’चा ट्रेलर पाहिला का?

दक्षिणेतील सुपरस्टार विजय देवरकोंडाच्या ‘लायगर’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. या ट्रेलरमध्ये विजयची दमदार ऍक्शन पहायला मिळालेली आहे. हैदराबाद येथे हा ट्रेलर सर्वात आधी रिलीज करण्यात आला. लायगरच्या ट्रेलरची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. धर्मा प्रॉडक्शनच्या लायगरमध्ये विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांची प्रमुख भूमिकेत आहे.

विजय देवरकोंडा लायगरमध्ये एका फायटरची भूमिका साकारतो आहे. ट्रेलरमध्ये त्याच्या फिटनेसने सगळ्यांचे लक्ष वेधलेले आहे. अभिनेत्री अनन्या पांडेनं विजयची गर्लफ्रेंड तर राम्या कृष्णन यांनी विजयच्या आईची भूमिका साकार केलेली आहे. लायगर सिनेमा २५ ऑगस्टला रिलीज होत असून मुंबई, हैदराबाद, अमेरिका आणि लास वेगास येथे लायगरचे शुटींग झालेले आहे. काही दिवसांपूर्वी लायगरमधील  ‘अकडी पकडी’ हे गाणं रिलीज झालं होतं जे प्रेक्षकांच्या पसंतीत उतरलं आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.