‘कियारा अडवाणी’चे खरे नाव माहित आहे का?

अभिनेत्री कियारा अडवाणी कबीर सिंग, गुड न्यूज, भूल भुलैया २, शेरशाह, जुग जुग जियो या चित्रपटात कियाराचा अभिनय आपण पाहिला असेलच. सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असून अनेक गोष्टींवरून तिची चर्चा होत असते. आज खास कियाराची आठवण काढायचे कारण म्हणजे कियाराचा आज ( ३१ जुलै) वाढदिवस आहे. ‘एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’मधीली कियारा ते अलीकडच्या ‘जुग जुग जियो’मधील कियारा यातून आपल्याला तिच्या अभियनाचा प्रवास पहायला मिळाला. तिचं वैयक्तिक आयुष्य, रिलेशनशिप स्टेटस याबद्दल नेहमीच चर्चा होते असते मात्र तुम्हाला माहित आहे का कियाराचे खरे नाव काय आहे.
एका मुलाखतीत कियाराने यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं होतं. बॉलीवूडमध्ये येण्याआधी कियाराचं नाव आलिया अडवाणी असे होतं. एका रिपोर्टनुसार अभिनेता सलमान खानने तिला आलिया हे नाव बदलण्यास सांगितले. कियाराचा बॉलीवूडमध्ये डेब्यू होण्याआधीच आलिया भट्ट प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून नावारुपाला आली होती. आलीया नावामुळे लोकांमध्ये गोंधळ निर्माण होवून नये म्हणून तिला नाव बदलण्याचा सल्ला सलमान खान याने दिला होता. आता आलीया ऐवजी आपलं नाव काय ठेवायचं असा विचार करत असताना अनजाना-अनजानी सिनेमातील प्रियांका चोप्राचे नाव तिला आवडले आणि आलिया अडवाणीचं नाव कियारा अडवाणी असे झाले.
कियाराने मास मिडियामध्ये मास्टर्स डिग्री देखील आहे. तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याआधी पदवी घ्यावी अशी तिच्या आईची इच्छा होती. कियाराच्या संदर्भात आणखी एक महत्त्वाची गोष्टी म्हणजे ती अशोक कुमार यांची सावत्र पणती आणि सईद जाफरी यांची नात आहे. कियाराच्या आई-वडिलांचा बॉलीवूडसोबत काही संबंध नाही मात्र मीडिया रिपोर्टनुसार कियाराची आई जेनेव्हिव्ह आणि सलमान खान लहानपणापासून एकमेकांना ओळखतात अशी माहिती समोर आलेली आहे.