रुपी बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा, वाचा काय घडलं !

रुपी सहकारी बँकेच्या खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रुपी बँकेचा परवाना रद्द करण्याच्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आदेशाला गुरुवारी मुंबई हायकोर्टाने १७ ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिली. त्यामुळे रुपी बँकेचे ठेवीदार आणि कर्मचाऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळालेला आहे.आरबीआयकडून ८ ऑगस्ट रोजी रुपी बँकेचा परवाना रद्द करण्याची घोषणा केली होती.
RBI च्या कारवाई विरोधात रुपी कर्मचारी संघटना व रुपी संघर्ष समितीने हायकोर्टात दाद मागितली होती. तर बँकेने केंद्रीय अर्थ विभागाच्या सहसचिवांकडे दाद मागीतली होती. पण RBI च्या अंतरिम आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला आणि १७ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी ठेवली. त्यानंतर बँकेने हायकोर्टाचे दरावजे ठोठावले.त्यावर सुनावणी घेऊन हायकोर्टाने
RBI च्या आदेशाला १७ ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिलेली आहे.रुपी बँकेच्या याचिकेला सकारात्मक प्रतिसाद देत हाकोर्टाने व्यवसाय परवाना रद्द करण्याच्या कारवाईला स्थगिती दिलेली आहे. हायकोर्टाच्या निर्णयामुळे खातेदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.