सिम सुरू ठेवण्यासाठी ‘हा’ आहे सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान !

खासगी टेलिकॉम कंपन्या सतत प्रीपेड प्लान्सच्या किंमतीत वाढ करत असताना सरकारी टेलिकॉम कंपनी अर्थात BSNL एक स्वस्त प्लॅन घेवून आलेली आहे. केवळ सीमकार्ड सुरु ठेवण्यासाठी BSNLचा Prepaid Plan अवघ्या १९ रुपयात उपलब्ध आहे.
फक्त १९ रुपयात BSNLच्या Prepaid Plan मुळे तुम्ही सिम कार्ड सुरु ठेवू शकता. महिन्याभरासाठी आणि तो ही इतका स्वस्त प्लॅन तुम्हाला इतक कंपन्यांकडे मिळणार नाही. कारण इतर टेलिकॉम कंपन्या मोबाईल नंबर ऍक्टिव ठेवण्यासाठी स्वस्त रिचार्ज प्लॅन देत आहेत पण त्याची किंमत ५० ते १२० रुपये अशी आहे. या कंपन्यांकडून तुम्हाला ४ जी नेटवर्क कनेक्टीव्हीट मिळते आहे तर BSNL तुम्हाल ३ जी नेटवर्क कनेक्टीव्हीट देते आहे. पण विचार करा तुम्हाला जर फक्त तुमचा मोबाईल नंबर सुरु ठेवायचा असेल तर BSNL चा हा Prepaid Plan अतिशय चांगला आहे. दरम्यान BSNL ची ४ जी सर्विस लवकरात लवकर सुरु होणार आहे.