मोदींकडून शिंदे गटाला केंद्रात पहिली जबाबदारी

राज्यातील एक मोठी बातमी समोर आलेली आहे मोदी सरकारकडून शिंदेगटाला केंद्रात पहिली जबाबदारी देण्यात आलेली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी शिंदे गटातील खासदाराची वर्णी लागलीय आणि ते खासदार कोण आहेत माहित आहे का ते आहेत बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव ! जाधव यांनीच उद्धव ठाकरे यांच्यावर नुकताच सनसनाटी आरोप केला होता. सचिन वाझे 100 कोटी रुपयांची वसुली करुन मातोश्रीवर पोहोचवत होता अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यामुळे ते खूप चर्चेत आले होते. त्यानंतर जाधव यांनी आपल्या वक्तव्याबद्दल सारवासारव केली होती,
आता प्रतापराव जाधवांची चक्क केंद्र सरकारने दखल घेतली असून त्यांच्यावर एक विशेष जबाबदारी सोपवण्यात आलीय. प्रतापराव जाधव यांची नियुक्ती माहिती आणि तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी करण्यात आली. शिंदे गटाला पहिल्यांदाच अशाप्रकारे केंद्रात मोदी सरकारमध्ये प्रतिनिधीत्व करण्याची संधी देण्यात आलेली आहे. आता या राडकीय घडामोडीवर चर्चा रंगलेल्या आहेत. संसदेच्या स्थायी समितीत काही महत्त्वाचे बदल केंद्र सरकारकडून करण्यात आले असून त्यात शिंदे गटाला महत्त्वाचं स्थान देण्यात आलंय.